रोनाल्डोवर मेस्सी ठरला भारी, शेवटच्या काही सेकंदांमध्ये केला गोल

By Admin | Updated: April 24, 2017 11:28 IST2017-04-24T11:25:42+5:302017-04-24T11:28:16+5:30

लिओनेल मेस्सीने केलेल्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने पारंपारिक प्रतिस्पर्धी रेआल माद्रिदवर विजय मिळवला.

Ronaldovers became Messi heavy, in the last few seconds, the goal was scored | रोनाल्डोवर मेस्सी ठरला भारी, शेवटच्या काही सेकंदांमध्ये केला गोल

रोनाल्डोवर मेस्सी ठरला भारी, शेवटच्या काही सेकंदांमध्ये केला गोल

ऑनलाइन लोकमत 

बर्नाब्यु, दि. 24 - सामना संपायला काही सेकंदाचा अवधी उरला असताना लिओनेल मेस्सीने केलेल्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने पारंपारिक प्रतिस्पर्धी रेआल माद्रिदवर विजय मिळवला. ला लिगा स्पर्धेतील साखळी गटातील या सामन्याकडे जगभरातील फुटबॉल शौकीनांचे लक्ष लागले होते. कारण मेस्सी विरुद्ध ख्रिस्टीयानो रोनाल्डो असे या सामन्याचे स्वरुप होते. मेस्सीचा बार्सिलोनासाठी हा 500 वा गोल ठरला. 
 
मेस्सी आणि रोनाल्डो हे जगातील दोन सर्वोत्तम फुटबॉलपटू प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर होते. मेस्सीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवून देत रोनाल्डोपेक्षा आपण का  सरस आहोत ते दाखवून दिले. बार्सिलोनाने हा सामना 3-2 च्या फरकाने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. 
 
सामना सुरु झाल्यानंतर 28 व्या मिनिटाला केसमिरोने गोल करुन रेआल माद्रिदला आघाडी मिळवून दिली. पण पाचच मिनिटात मेस्सीने उत्कृष्ट मैदानी गोल करुन बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर बार्सिलोनाच्या राकीटीसने 73 व्या मिनिटाला गोल करुन आघाडी 2-1 वाढवली. 
 
पण बार्सिलोनाचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. रेआलच्या जेम्स रॉड्रीग्झने 85 व्या मिनिटाला गोल करुन बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच अतिरिक्तवेळेत 92 व्या मिनिटाला मेस्सीने मैदानी गोल करुन बार्सिलोनाचा विजय सुनिश्चित केला. 
 
 

Web Title: Ronaldovers became Messi heavy, in the last few seconds, the goal was scored