रोनाल्डो बनला युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर

By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:20+5:302014-08-29T23:33:20+5:30

मोनाको : पोर्तुगालचा जादुई स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा फुटबॉलपटू ठरला.

Ronaldo becomes European Footballer of the Year | रोनाल्डो बनला युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर

रोनाल्डो बनला युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर

नाको : पोर्तुगालचा जादुई स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा फुटबॉलपटू ठरला.
या शर्यतीत विश्व चॅम्पियन जर्मनीचा मॅन्युएल न्यूएर आणि हॉलंडचा आर्जेन रॉबेन असतानाही रोनाल्डोने बाजी मारली. या पुरस्कारासाठी झालेल्या मतात रोनाल्डो अव्वल ठरला. रोनाल्डो हा पुरस्कार मिळवणारा चौथा फुटबॉलपटू ठरला. याआधी फ्रँक रिबेरी, आंद्रेस इनिएस्ता आणि लियोनल मेस्सी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.
गतवर्षी मेस्सी आणि रोनाल्डो यांना पिछाडीवर टाकताना रिबेरी युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयरचा मानकरी ठरला होता. यंदा ५४ युरोपियन पत्रकारांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात रोनाल्डो जिंकला. यूईएफएचे अध्यक्ष मायकल प्लातिनी यांच्याकडून रोनाल्डोने हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर रोनाल्डो म्हणाला, या पुरस्कारासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. मी खूप खुश आहे. मी माझ्या संघाचेही आभार मानू इच्छितो. कारण अशा चांगल्या संघाशिवाय एखाद्या व्यक्तीला हा अवॉर्ड मिळू शकत नाही.

Web Title: Ronaldo becomes European Footballer of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.