ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा धडाका ला लीगा : रेयाल माद्रिदची अव्वल स्थानी झेप

By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:16+5:302016-10-30T22:47:16+5:30

माद्रिद : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने नोंदवलेल्या शानदार तीन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने एकतर्फी झालेल्या सामन्यात एल्वेस संघाला ४-१ असे लोळवले. या दणदणीत विजयासह रेयाल माद्रिदने ला लीगा लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

Ronaldo beat La Liga: Real Madrid win top spot | ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा धडाका ला लीगा : रेयाल माद्रिदची अव्वल स्थानी झेप

ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा धडाका ला लीगा : रेयाल माद्रिदची अव्वल स्थानी झेप

द्रिद : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने नोंदवलेल्या शानदार तीन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने एकतर्फी झालेल्या सामन्यात एल्वेस संघाला ४-१ असे लोळवले. या दणदणीत विजयासह रेयाल माद्रिदने ला लीगा लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
शनिवारी झालेल्या या सामन्यात एल्वेस संघाचा रोनाल्डोच्या आक्रमक खेळापुढे काहीच निभाव लागला नाही. दरम्यान, एल्वेसने वेगवान सुरुवात करताना सातव्याच मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. फॉरवर्ड डेवरसन याने सातव्याच मिनिटाला जबरदस्त गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर मात्र रेयाल माद्रिदने तुफान आक्रमण करताना एल्वेसच्या आव्हानातली हवा काढली. माद्रिदच्या विजयाच्या हीरो ठरलेल्या रोनाल्डोने १७ व्या, ३३ व्या आणि ८८ व्या मिनिटाला गोल करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याचप्रमाणे, रोनाल्डोशिवाय स्पॅनिश स्ट्रायकर अल्वारो मोराटा यानेही ८४ व्या मिनिटाला दमदार गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले. या दणदणीत विजयासह रेयाल माद्रिद संघाने २४ गुणांसह स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. (वृत्तसंस्था)

Web Title: Ronaldo beat La Liga: Real Madrid win top spot