नवी दिल्ली : रोम रँकिंग सिरिज कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने धडाकेबाज कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई केली. ५३ किलो वजन गटात विनेशने अंतिम फेरीत इक्वेडोरच्या लुईसा एलिजाबेथचा ४-० ने पराभव केला. नववर्षात विनेशचे हे पहिले सुवर्णपदक ठरले.अंतिम फेरीत विनेशला फारशी कडवी टक्कर मिळाली नसली, तरीही अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता खडतर होता. प्राथमिक फेरीत विनेशने चीनच्या दोन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान मोडीत काढले. युक्रेनच्या ख्रिस्टीना ब्रिझा आणि चीनची लानून लिओवर विनेशने अनुक्रमे १०-० आणि १५-५ अशी मात केली. दोन्ही लढतीत विनेशने खास डावपेचांवर भर देत प्रतिस्पर्धी खेळाडूला नामोहरम केले होते. अंतिम फेरीत विनेशला फारशी टक्कर मिळाली नाही. टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी विनेशला पदकाची आशा आहे. (वृत्तसंस्था)या स्पर्धेत मी आधी कधीही न खेळलेल्या प्रतिस्पर्धी मल्लांविरुद्ध दोन हात केले. पांगविरुद्ध मात्र माझी तिसरी लढत होती. तिच्या शैलीत काही बदल झाला का, हे जाणून घेणे आवश्यक होते. अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला स्वत: या खेळासोबतच प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या डावपेचांचे आकलन करण्यास वाव असतो. कोच वोलत एकोस यांच्या मार्गदर्शनात स्वत:च्या शैलीत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे चांगले निकाल येऊ लागले. मला जे अपेक्षित आहे, त्यापासून आता काहीच पावले दूर आहे. मॅटवर कुस्ती केल्याने हवे तसे गुण मिळविता येत नाहीत. भारतात मॅटवर कुस्ती खेळून सहजपणे गुण मिळविण्यात माझा हातखंडा आहे. मात्र आंतरराष्टÑीय स्तरावर हे कठीण काम आहे. मी जितक्या स्पर्धांमध्ये सहभागी होईन, तितकी अनुभवात भर पडणार आहे.- विनेश फोगाटबजरंग पुनिया अंतिम फेरीतभारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शनिवारी ६५ किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरी गाठत आपले पदक पक्के केले. मात्र जितेंद्रला ७४ किलो गटात तर दीपक पुनियाला ८६ किलो गटात पराभवाचा सामना करावा लागला. रविकुमार दहियाने ५७ ऐवजी ६१ किलो वजन गटातून सहभागी होत दोन फेऱ्या जिंकल्या आहेत.
रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 04:13 IST