रोहितची आयपीएल खेळी: केकेआरला १६९ धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 8, 2015 21:37 IST2015-04-08T21:31:05+5:302015-04-08T21:37:02+5:30

कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल - ८ च्या सलामीच्या सामन्यात मुंबईने ३ बाद १६८ धावा केल्या.

Rohit's IPL match: KKR chasing 169 runs | रोहितची आयपीएल खेळी: केकेआरला १६९ धावांचे आव्हान

रोहितची आयपीएल खेळी: केकेआरला १६९ धावांचे आव्हान

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल - ८ च्या सलामीच्या सामन्यात मुंबईने ३ बाद १६८ धावा केल्या.
कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने टॉस जिंकला व मुंबईला फलंदाजी करण्यास पाचारण केले. गौतम गंभीरचा हा निर्णय योग्य ठरवित कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबईच्या आदित्य तारे (७), अंबाती रायडू (०) आणि फिन्च (५) धावांवर लागोपाठ बाद करीत माघारी धाडले. परंतू त्यानंतर आलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाताच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवीत अफलातून फटकेबाजी केली. रोहित शर्माचे शतक २ धावाने हुकले. रोहितने नाबाद ९८ धावा करीत कर्णधाराला साजेशी खेळी केली. तर एन्डरसनने सुध्दा आक्रमक फटकेबाजी करीत ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार व ३ षटकार ठोकले. कोलकाताकडून मोर्केल २ तर शाकीबला १ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Web Title: Rohit's IPL match: KKR chasing 169 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.