रोहितने संधीचा लाभ घ्यावा
By Admin | Updated: December 4, 2015 01:20 IST2015-12-04T01:20:41+5:302015-12-04T01:20:41+5:30
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दक्षिण आफ्रिका संघाला आनंद झाला असेल. कारण कोटलाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर चेंडू वळत आहेत, पण खेळपट्टी थोडी कोरडी आहे.

रोहितने संधीचा लाभ घ्यावा
- वसीम अक्रम लिहितो....
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दक्षिण आफ्रिका संघाला आनंद झाला असेल. कारण कोटलाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर चेंडू वळत आहेत, पण खेळपट्टी थोडी कोरडी आहे. भारतीय फलंदाजांनी काही चुकीचे फटके खेळल्याचे दिसून
आले. विशेषता रोहित शर्माबाबत मला वाईट वाटले. तो प्रतिभावान क्रिकेटपटू असून अनुभवी आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आठ वर्षांचा अनुभव आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये जर यश मिळत नसेल तर स्मार्ट क्रिकेट खेळण्याची गरज असते. गरज नसताना त्याने अवसानघातकी फटका खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यासाठी तुम्हाला फार कमी संधी मिळते. रोहितने मिळालेल्या संधीचा लाभ घायला हवा. कर्णधाराने त्याच्यासोबत फटक्याची निवड करण्याबाबत चर्चा करायला हवी. पहिल्या दिवशीच्या खेळात त्याने चुकीचा फटका खेळून विकेट बहाल केली. मी सुद्धा त्याला संघातून वगळले नसते. तो प्रतिभावान असून त्याच्यावर विश्वास दाखविला
असता. भारतात खेळाडूंचा मोठा पूल असल्यामुळे रोहितने मिळालेल्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
वृद्धिमान साहानेही महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्वीकारल्यानंतर मिळालेल्या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. साहा सध्या भारताच्या विद्यमान यष्टिरक्षकांमध्ये सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे, असे ठामपणे म्हणता येईल. त्याच्यात धावा फटकावण्याची क्षमता आहे. त्याची फलंदाजीची सरासरी ३५ च्या आसपास असायला हवी. त्यासाठी त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ तळ ठोकायला पाहिजे. त्याने फटक्यांची निवड करताना सावधगिरी बाळगायला हवी. मोर्ने मोर्कलसारख्या विश्व दर्जाच्या गोलंदाजाविरुद्ध मैदानावर पाय ठेवल्याबरोबर फटके मारणे सोपे नसते. चेतेश्वर पुजाराही चांगला खेळाडू आहे. तो एका सरळ येण्याऱ्या
चेंडूवर चुकला. अपेक्षेपेक्षा खाली राहिलेला चेंडू बॅट आणि पॅडच्या गॅपमधून गेला. एका चांगल्या सुरुवातीनंतर तो दुर्दैवी ठरला.
विराट कोहलीला सूर गवसल्याचे दिसले. त्याने काही शानदार
फटके मारले. तो मोठी खेळी करेल, असे वाटत असताना तो बाद झाला. त्यामुळे तो नक्कीच निराश झाला असेल. (टीसीएम)