रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

By Admin | Updated: August 12, 2015 04:17 IST2015-08-12T04:17:39+5:302015-08-12T04:17:39+5:30

रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Rohit, as many as 17 people are recommended for the Arjuna Award | रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

रोहित, जितूसह १७ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली : क्रिकेटपटू रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह १७ खेळाडूंच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त पुरस्कार निवड समितीने मंगळवारी केली.
रोहित आणि जितू यांच्यासह जी नावे निश्चित करण्यात आली, त्यांत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. ब्रिजेश, मल्ल बजरंग आणि बबिता, अ‍ॅथलिट एम. आर. पूवम्मा, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि बॉक्सर मनदीप जांगडा यांचा समावेश आहे. ही शिफारस क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पाठविण्यात येणार असून, ते अंतिम निर्णय घेतील. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पुरस्कारांचे वितरण करतील.
खेलरत्न पुरस्कारासाठी ७ लाख ५० हजार रोख आणि प्रशस्तिपत्र तसेच अर्जुन पुरस्कारविजेत्यांना ५ लाख रोख आणि प्रशस्तिपत्र, असे स्वरूप असेल.

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे अशी : पी. आर. श्रीजेश (हॉकी), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), जितू रॉय (नेमबाजी), संदीपकुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोइंग), सतीश शिवलिंगम (भारोत्तोलन), संथोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एमआर पूवम्मा (अ‍ॅॅथलेटिक्स), मनजित छिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) आणि अनूपकुमार (रोलर स्केटिंग).

Web Title: Rohit, as many as 17 people are recommended for the Arjuna Award