रो‘हिट’मध्ये लंका होरपळली
By Admin | Updated: November 14, 2014 02:14 IST2014-11-14T02:14:54+5:302014-11-14T02:14:54+5:30
रोहित शर्माच्या (264) विक्रमी द्विशतकी खेळीनंतर धवल कुलकर्णीने (4-34) केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गुरुवारी चौथ्या वन-डेत श्रीलंकेचा 153 धावांनी पराभव केला.

रो‘हिट’मध्ये लंका होरपळली
चौथी वन-डे : रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळी, भारत 153 धावांनी विजयी
कोलकाता : रोहित शर्माच्या (264) विक्रमी द्विशतकी खेळीनंतर धवल कुलकर्णीने (4-34) केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गुरुवारी चौथ्या वन-डेत श्रीलंकेचा 153 धावांनी पराभव केला. भारताने या मालिकेत 4-क् अशी आघाडी घेतली आहे.
नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा:या भारताने 5 बाद 4क्4 धावांची मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणा:या श्रीलंका संघाचा डाव 43.2 षटकांत 251 धावांत गुंडाळला. श्रीलंकेतर्फे कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूज (75 धावा, 68 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार), लाहिरू थिरिमाने (59 धावा, 7 चौकार, 1 षटकार), तिलकरत्ने दिलशान (34 धावा, 6 चौकार) व थिसारा परेरा (29 धावा, 1 चौकार, 3 षटकार) यांचे प्रयत्न अपुरेच पडले. भारतातर्फे कुलकर्णी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला उमेश यादव (2-38), स्टुअर्ट बिन्नी (2-55) व अक्षर पटेल (2-51) यांची योग्य साथ लाभली. त्याआधी, दुखापतीतून सावरल्यानंतर यशस्वी पुनरागमन करताना आयसीसी विश्वकप 2क्15 च्या स्पर्धेसाठी संघातील स्थान पक्के करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माच्या (264) डबल धमाक्याच्या जोरावर भारताने 5 बाद 4क्4 धावांची दमदार मजल मारली. भारताने नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रोहितने 264 धावांची खेळी केली. रोहितची ही कारकीर्दीतील सवरेत्तम खेळी ठरली. रोहित डावाच्या अखेरच्या चेंडूवर नुवान कुलसेखराच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहितची 264 धावांची खेळी वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची ठरली. रोहितने वन-डे क्रिकेट कारकीर्दीतील दुस:यांदा द्विशतक झळकाविले.
सलामीचा सहकारी अजिंक्य रहाणो (28) बाद झाल्यानंतर रोहितने धावफलक हलता ठेवण्याची भूमिका चोख बजावली. रोहितने 1क्क् चेंडूंमध्ये 1क्क् आणि त्यानंतर 151 चेंडूंमध्ये 2क्1 धावांची विक्रमी खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. (वृत्तसंस्था)
आई म्हणते..
संधीचं
सोनं केलं
दुखापतीमुळे रोहित खुप चिडचिडा झाला होता, परंतु त्याचे ध्येय पुन्हा वन डे खेळण्याचे होते आणि त्यासाठी तो सातत्याने सराव करत होता. दिड महिन्यानंतर त्याला संधी मिळाली. o्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात त्याने शतक झळकावून संधीचे सोनं केले. तरी त्याच्या दुखापतीची चिंता मला होतीच. घरी परतल्यावर त्याला हात कसा आहे, असे मी विचारले. त्यावर त्याने सकारात्मक उत्तर देऊन o्रीलंकेविरुद्ध दोन वन डे खेळायचे आहेत असे ठामपणो सांगितले. आज त्याने मिळालेल्या संधीवर सर्वोत्तम खेळ केला आहे.
- पौर्णिमा शर्मा,
रोहितची आई
भारत : रहाणो पायचित गो. मॅथ्यूज 28, रोहित शर्मा ङो. जयवर्धने गो. कुलसेकरा 264, अबांती रायडू त्रि. गो. इरंगा क्8, विराट कोहली धावबाद 66, सुरेश रैना ङो. जयवर्धने गो. मॅथ्यूज 11, रॉबिन उथप्पा नाबाद 16. अवांतर (11). एकूण 5क् षटकांत 5 बाद 4क्4. गोलंदाजी : कुलसेकरा 9-क्-89-1, मॅथ्यूज 8-1-44-2, इरांगा 1क्-क्-77-1, परेरा 5-क्-43-क्, प्रसन्ना 1क्-क्-7क्-क्, मेंडिस 7-क्-7क्-क्, दिलशान 1-क्-11-क्.
श्रीलंका : कुशल परेरा ङो. कर्ण शर्मा गो. यादव क्क्, तिलकरत्ने दिलशान ङो. रैना गो. बिन्नी 34, दिनेश चंदीमल ङो. रैना गो. बिन्नी क्9, माहेला जयवर्धने पायचित गो. यादव क्2, अॅन्जेलो मॅथ्यूज यष्टिचित उथप्पा गो. पटेल 75, लाहिरू थिरिमाने ङो. कोहली गो. कुलकर्णी 59, थिसारा परेरा ङो. उथप्पा गो. कुलकर्णी 29, सीकुगे प्रसन्ना ङो. पटेल गो. कुलकर्णी 11, नुवान कुलसेकरा ङो. रायडू गो. कुलकर्णी क्क्, अजंता मेंडिस ङो. कर्ण शर्मा गो. पटेल क्4, शमिंडा इरंगा नाबाद 12. अवांतर (16). एकूण 43.1 षटकांत सर्वबाद 251. गोलंदाजी : उमेश यादव 8-क्-38-2, स्टुअर्ट बिन्नी 8-क्-55-2, धवल कुलकर्णी 1क्-1-34-4, कर्ण शर्मा 9-1-64-क्, अक्षर पटेल 7.1-क्-51-2.
रोहितने शानदार फलंदाजी केली. प्रतिभा असलेला हाच खरा रोहित आहे. त्याची फलंदाजी बघा आणि आनंद साजरा करा. -महेंद्रसिंह धोनी
रोहित शर्मा आता भगवान रामानंतर श्रीलंकेविरुद्ध दुसरा सवरेत्तम कामगिरी करणारा आहे.
-रवींद्र जडेजा
हा विक्रम मोडणो अशक्य आहे. इतिहास नोंदविण्यासाठी ‘शाबाश भाई’. -हरभजन सिंह
रोहितपुढे पुढचे लक्ष्य आयपीएलमध्ये द्विशतकी खेळी करण्याचे असेल. काहीच अशक्य नाही. अद्भूत, विश्वास बसत नाही. - अनिल कुंबळे
श्रीलंकेच्या साधारण मा:यापुढे रोहितची खेळी असाधारण होती.
-संजय मांजरेकर
विश्वास बसत नाही, की रोहितने त्रिशतक झळकाविले नाही, बेकार आहे. रोहितने आता दोनदा द्विशतकी खेळी केली, मला एकदाही शतक झळकाविता आले नाही, बेकार आहे. इंग्लंड संघाने अखेरच्या 5क् वन-डे सामन्यांमध्ये सरासरी 259 धावा फटकाविल्या.. रोहितने एकटय़ाने 264 धावांची खेळी केली.
-मायकल वॉन
अप्रतिम फटकेबाजी.. रोहितच्या खेळीने डोळे दिपवून टाकले. त्याच्या या खेळीतून त्याने घेतलेली मेहनत दिसत होती.- इरफान पठाण
वॉव.. एक अप्रतिम खेळाडूचा अप्रतिम खेळ पाहताना आंनद झाला. रोहितचे अभिनंदन.
- व्ही. व्ही. एस लक्ष्मण
सर्वोत्तम खेळी.. रोहितच्या फटकेबाजीचा आंनद लुटला.
- झहीर खान