शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Padma Award 2024: क्रीडा विश्वातील सात शिलेदारांना पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्रातील गुरूचाही सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 12:43 IST

क्रीडा विश्वातील सात जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

Padma Award 2024 for Sports: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि स्क्वॅशपटू जोश्ना चिनप्पा यांची २०२४ च्या पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खरं तर पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या यादीत मल्लखांबचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे, भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक गौरव खन्ना, तिरंदाज पुरिमा महतो, पॅरा-स्विमर सतेंद्र सिंग लोहिया आणि माजी हॉकीपटू हरबिंदर सिंग यांचा समावेश आहे.

मल्लखांबचे प्रशिक्षक उदय देशपांडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांना या खेळाचे गुरू म्हणून ओळखले जाते. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते औपचारिक समारंभात प्रदान केले जातील. दरवर्षी मार्च किंवा एप्रिलच्या आसपास राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 

क्रीडा विश्वातील ७ जणांना पद्म पुरस्कार

  1. रोहन बोपन्ना - टेनिस 
  2. जोश्ना चिनप्पा - स्क्वॅश
  3. उदय विश्वनाथ देशपांडे - मल्लखांब
  4. गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन 
  5. सतेंद्र सिंह लोहिया - जलतरण 
  6. पूर्णिमा महतो - तिरंदाजी 
  7. हरबिंदर सिंह - पॅरालिम्पिक तिरंदाजी 

बोपन्नाने रचला इतिहास तरूणाईला लाजवेल अशी कामगिरी करून ४३ वर्षीय रोहन बोपन्नाने इतिहास रचला. अलीकडेच तो पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा टेनिस इतिहासातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. बोपन्ना सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या अंतिम फेरीतही त्याने मजल मारली आहे. 

मल्लखांबचे गुरू उदय देशपांडे उदय विश्वनाथ देशपांडे हे मल्लखांब या प्राचीने खेळाशी संबंधित आहेत. त्यांनी अनेक देशांतील खेळाडूंना या खेळाचे धडे दिले. १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाज पुरिमा महतोने रौप्य पदक जिंकले होते. २००८ आणि २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. याशिवाय पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना, पॅरा जलतरणपटू सतेंद्र सिंग लोहिया हे असे खेळाडू आहेत, ज्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय खेळातील योगदानासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कारTennisटेनिस