रॉजर्स चषक टेनिस : केर्बर सेमीफायनलमध्ये
By Admin | Updated: July 30, 2016 19:00 IST2016-07-30T19:00:17+5:302016-07-30T19:00:17+5:30
जर्मनीची स्टार खेळाडू एंजेलिक केर्बरने बिगर मानांकित रशियाच्या दारिया कसात्किनाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 6-2, 6-2 असे सहजपणो हरवून रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे

रॉजर्स चषक टेनिस : केर्बर सेमीफायनलमध्ये
>ऑनलाइन लोकमत -
सिमोना हालेपसोबत होणार मुकाबला
टोरँटो, दि. 30 - जर्मनीची स्टार खेळाडू एंजेलिक केर्बरने बिगर मानांकित रशियाच्या दारिया कसात्किनाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 6-2, 6-2 असे सहजपणो हरवून रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. येथे तिची लढत रोमानियाच्या सिमोना हालेपशी होणार आहे. ही जोडी यापूर्वी नुकतीच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व सामन्यात एकमेकांविरुध्द खेळली होती. हा सामना केर्बरने जिंकला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी आता हालेपला आली आहे. हालेपने रशियाच्या नवव्या मानांकित स्वेतलाना कुज्नेत्सोवाविरुध्द 3-6, 6-1, 6-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
सामन्यानंतर हालेप म्हणाली, 'हा एक कठीण सामना होता. स्वेतलाना चांगली खेळत होती, शिवाय चांगल्या लयीत होती. सुरवातीला मी थोडी दबावात होते, परंतु नंतर मला लय सापडली. हा विजय माझा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. या स्पर्धेत मी पहिल्यांदाच अंतिम चार खेळाडूमध्ये पोहचले आहे. मी माङया खेळात सातत्याने सुधारणा केली आहे. माझ्या खेळावर मी समाधानी आहे'.