रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव
By Admin | Updated: January 24, 2015 01:34 IST2015-01-24T01:34:48+5:302015-01-24T01:34:48+5:30
ग्रॅण्ड स्लॅमचा बादशाह व किताबाचा प्रबळ दावेदार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला शुक्रवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाचे तोंड पाहावे लागले.

रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव
मेलबर्न : ग्रॅण्ड स्लॅमचा बादशाह व किताबाचा प्रबळ दावेदार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला शुक्रवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाचे तोंड पाहावे लागले. इटलीच्या बिगरमानांकित आंद्रियस सेप्पीने त्याला पराभवाची चव चाखवली. दुसरीकडे स्पेनच्या राफेल नदालने इस्राईलच्या डूडी सेलाचा, तर महिला एकेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाने कजाकिस्तानच्या झरिना डियासचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यांमध्ये सहाव्या मांनाकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेने पराभव टाळण्यात यश मिळवले आणि त्याने पोर्तुगालच्या जोआओ सोसाचा सरळ सेटमध्ये ६-१, ६-१, ७-५ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. मरेला पुढच्या फेरीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवशी मुकाबला करावा लागेल. दिमित्रोवने मार्कोस बगदातिसचा ४-६, ६-३, ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्दीचनेही सर्बियाच्या विक्टर ट्रोएकीचा ६-४, ६-३, ६-४ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)