रोबक यांच्या आत्महत्येची पुन्हा चौकशी होणार

By Admin | Updated: August 4, 2015 00:37 IST2015-08-04T00:37:01+5:302015-08-04T00:37:01+5:30

प्रसिद्ध क्रिकेटलेखक पीटर रोबक यांच्या चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

Roebuck's suicide attempt will be re-investigated | रोबक यांच्या आत्महत्येची पुन्हा चौकशी होणार

रोबक यांच्या आत्महत्येची पुन्हा चौकशी होणार

सिडनी : प्रसिद्ध क्रिकेटलेखक पीटर रोबक यांच्या चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
इंग्लंडमध्ये जन्मलेले ५५ वर्षीय रोबक २०११ मध्ये आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील
कसोटी मालिका कव्हर करीत
होते. त्या वेळी केपटाऊनमधील सदर्न सन हॉटेलात त्यांनी आत्महत्या केली होती.
दक्षिण आफ्रिकन पोलिसांच्या मते त्यांनी हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरील आपल्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली होती. एका झिम्बाब्वेयन नागरिकाने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दिली होती. त्यासाठी पोलीस त्यांना अटक करण्यास गेले असता हा प्रकार घडला होता.
(वृत्तसंस्था)

Web Title: Roebuck's suicide attempt will be re-investigated