रितू राणी भारतीय संघाची कर्णधार
By Admin | Updated: September 4, 2014 01:32 IST2014-09-04T01:32:34+5:302014-09-04T01:32:34+5:30
दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणा:या आगामी आशियाई स्पर्धेसाठी 16 सदस्यीय भारतीय महिला संघ घोषित करण्यात आला आह़े

रितू राणी भारतीय संघाची कर्णधार
आशियाई स्पर्धा : दीपिका उपकर्णधार
नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणा:या आगामी आशियाई स्पर्धेसाठी 16 सदस्यीय भारतीय महिला संघ घोषित करण्यात आला आह़े संघाच्या कर्णधारपदी अनुभवी मिडफिल्डर रितू राणी हिची निवड करण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपिका हिच्याकडे सोपविण्यात आली आह़े
हॉकी इंडियाचे निवडकर्ता बी़ पी़ गोविंदा, हरबिंदर सिंह आणि सुरिंदर कौर तसेच हाय परफॉरमेन्स निदेशक रोलैंट गोल्टमेस, मुख्य प्रशिक्षक निल हावूड यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी आणि पटियाला येथे आयोजित निवड चाचणीतील कामगिरी या आधारे संघ निवडला आह़े (वृत्तसंस्था)
या संघात रितूसह अनुभवी खेळाडू अमनदीप कौर आणि डिफेंडर मोनिका हिचाही समावेश करण्यात आला आह़े राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होत़े
आशियाई स्पर्धेत 22 सप्टेंबर रोजी भारताचा पहिला सामना थायलंडशी होणार आहे, तर पुढचा सामना 24 सप्टेंबर रोजी चीन आणि त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी भारताला मलेशियाशी दोन हात करावे लागणार आह़े भारतीय संघ 13 सप्टेंबर रोजी आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आह़े (वृत्तसंस्था)
गोलकिपर : सविता, डिफेंडर : दीप ग्रेस, दीपिका, सुनीला लाकडा, नमिता टोपो, जसप्रीत कौर, सुशीला चानू, मोनिका, मिडफिल्डर : रितू राणी, लिलिमा मिंज, अमनदीप कौर, चनचन देव थोकचोम, फॉरवर्ड : राणी, पूनमराणी, वंदना कटारिया, नवज्योत कौऱ