रिओ ऑलिम्पिक : महिला तिरंदाजी संघ उप उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: August 6, 2016 21:03 IST2016-08-06T19:59:12+5:302016-08-06T21:03:06+5:30
दीपिका कुमारीच्या नेतृत्वात भारतीय महिला तिरंदाजी संघाने समाधानकारक सुरुवात करीत रँकिंग राऊंडमधील सातव्या स्थानासह उप उपांत्यपूर्व फेरी गाठली.

रिओ ऑलिम्पिक : महिला तिरंदाजी संघ उप उपांत्यपूर्व फेरीत
>शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ६ - दीपिका कुमारीच्या नेतृत्वात भारतीय महिला तिरंदाजी संघाने समाधानकारक सुरुवात करीत रँकिंग राऊंडमधील सातव्या स्थानासह उप उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दीपिकाने शान7दार सुरुवात केली पण नंतर कच खाल्ल्याने तिला ६४० गुणांसह २० वे स्थान मिळाले. ३० वेळा नेम साधल्यानंतर दीपिकाचे १३ नेम अचूक लागले. लैशराम बोंबाल्यादेवी ६३८ गुणांसह २४ व्या आणि लक्ष्मीराणी मांझी ६१४ गुणांसह ४३ व्या स्थानावर घसरली. तिन्ही खेळाडूंनी वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये पहिल्या ३२ खेळाडूंमध्ये धडक दिली. सांघिक फेरीत १८९२ गुणांसह त्यांना अव्वल १६ संघात स्थान मिळाले. पहिल्या तिन्ही स्थानांवर कोरियाचे खेळाडू आहेत. (वृत्तसंस्था)
दीपिका आश्चर्यचकित...
महिला तिरंदाजीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीबद्दल स्वत: दीपिका कुमारीने अश्चर्य व्यक्त केले पण चूक कुठे झाली हे मात्र सांगितले नाही. ती म्हणाली,‘ वेगवान वा-याचा अपवाद वगळता काहीच वावगे नव्हते. मी नेम साधला पण तो चुकला. काय,झाले हे कळायला मार्ग नाही.’