रिओ ऑलिम्पिक : नोवाक जोकोविच पहिल्याच फेरीत पराभूत
By Admin | Updated: August 8, 2016 12:31 IST2016-08-08T08:51:11+5:302016-08-08T12:31:39+5:30
टेनिस जगतात अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

रिओ ऑलिम्पिक : नोवाक जोकोविच पहिल्याच फेरीत पराभूत
>ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. ८ - टेनिस जगतात अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र फारशी चमक दाखवता आलेली नसून पहिल्याच फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जोकोविचला पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन देल पोतरोने जोकोविचचा 7-6 (7/4), 7-6 (7/2) असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिकमधील जोकोविचच्या या पराभवामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.