रिओ ऑलिम्पिक - जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं
By Admin | Updated: August 7, 2016 00:54 IST2016-08-07T00:51:49+5:302016-08-07T00:54:06+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आहे. एअर पिस्टल प्रकारातील अंतिम फेरीत त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

रिओ ऑलिम्पिक - जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 7 - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आहे. एअर पिस्टल प्रकारातील अंतिम फेरीत त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
जीतू रायनं नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत सहावं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता. मात्र अंतिम फेरीत त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आलं आहे.
एअर पिस्टल प्रकारात व्हिएतनमच्या होआंग जुआन विन्हने जिंकले सुवर्ण पदक पटकावले. तर ब्राझिलच्या फेलिपे आल्मेडाला रौप्य आणि चीनच्या पांग वेई याला कास्य पदक मिळाले.