रिओ ऑलिम्पिक : भारतीय पुरूष हॉकी संघाचा आयर्लंडवर ३-२ विजय
By Admin | Updated: August 6, 2016 21:35 IST2016-08-06T21:13:38+5:302016-08-06T21:35:20+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघाने आयर्लंडला ३-२ असे पराभूत केले.

रिओ ऑलिम्पिक : भारतीय पुरूष हॉकी संघाचा आयर्लंडवर ३-२ विजय
शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ६ - संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला दिमाखात सुरूवात झाली असून त्यामध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने विजयी सलामी दिली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला ३-२ असे पराभूत करून स्पर्धेची यशस्वी सुरूवात केली. तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये विजयाची चव चाखली आहे.
भारत व आयर्लंडदरम्यान झालेला हा सामना अटीतटीचा होता. सुरूवातीस भारताने आयर्लंडवर २-० व त्यानंतर ३-१ अशी आघाडी घेतली. मात्र आयर्लंडला या सामन्यात ९ पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाल्याने त्यांनी योग्य फायदा उठवत एकामागोमाग एक असे २ गोल केले. त्यामुले भारतीय संघावर दबाव आला. मात्र त्यानंतर शेवटची अवघी काही मिनिटे उरलेली असताना भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन करत योग्य समन्वय राखला व विजय खेचून आणला.
#Hockey: India beat Ireland 3-2 in the first match #Rio2016
— ANI (@ANI_news) August 6, 2016
Well played @TheHockeyIndia India wins 3-2 against Ireland.Congrats pic.twitter.com/5ZZ3u6pcuX
— Kuldeep Ahlawat (@kuldeepahlawat) August 6, 2016