रिओ ऑलिम्पिक : रोर्इंगमध्ये दत्तू उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: August 6, 2016 21:02 IST2016-08-06T20:35:36+5:302016-08-06T21:02:45+5:30
रोर्इंग प्रकारात एकमेव असलेला भारतीय खेळाडू दत्तू भोकानल सेंगले हा शनिवारी पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.

रिओ ऑलिम्पिक : रोर्इंगमध्ये दत्तू उपांत्यपूर्व फेरीत
शिवाजी गोरे,
रिओ दी जानेरो , दि. ६ - रोर्इंग प्रकारात एकमेव असलेला भारतीय खेळाडू दत्तू भोकानल सेंगले हा शनिवारी पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
पहिल्या दिवशी पहिल्याच हिटमध्ये दत्तूने ७ मिनिटे २१.६७ सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरे स्थान मिळविले. टीम हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर राहणा-या रोव्हर्सना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळते. या हिटमध्ये क्यूबाचा अँजेल रॉड्रिग्ज सात मिनिटे ०६.८९ सेंकदांसह अव्वल स्थानावर राहिला.(वृत्तसंस्था)