रिओ ऑलिम्पिक : अपूर्वी, आयोनिका नेमबाजी स्पर्धेतून बाहेर
By Admin | Updated: August 6, 2016 21:03 IST2016-08-06T19:54:46+5:302016-08-06T21:03:36+5:30
भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेला आणि आयोनिका पाल यांचा रिओ आॅलिम्पिकमधील महिलांच्या १० मीटर एअरच्या पात्रता फेरीतच पराभव झाला

रिओ ऑलिम्पिक : अपूर्वी, आयोनिका नेमबाजी स्पर्धेतून बाहेर
शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ६ - भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेला आणि आयोनिका पाल यांना रिओ आॅलिम्पिकमध्ये शनिवारी महिलांच्या १० मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पात्रता फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. अपूर्वी ४११.६ गुणांसह ५१ स्पर्धकांमध्ये ३४ व्या स्थानावर राहिली. आयोनिकाला ४०३ गुणांसह ४७ व्या स्थानावर समाधान मानावे
लागले.
चीनची ली ड्यू हिने पात्रता फेरीत ४२०.७ गुणांसह आॅलिम्पिक विक्रमाची नोंद करीत अव्वल स्थान पटकावले.जर्मनीची बारबरा एंगलेडर, इराणची इलाही अहमादी, रशियाची दारिया दोविना, अमेरिकेची वर्जिनिया थ्रेशर व सारा शेरर, पोलंडची जेजाना पेचिक आणि चीनची सिलिंग यी अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अपूर्वी व आयोनिका यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा होती, पण २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावणाºया या दोन्हीखेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.
२३ वर्षीय अपूर्वीने कोरियाच्या चांगवानमध्ये २०१५ मध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्व कप स्पर्धेत १० मीटर एअर रायफल नेमबाजीत तिसरे स्थान पटकावताना आॅलिम्पिक पात्रता मिळवली होती. त्याचप्रमाणे २३ वर्षीय आयोनिकाने जानेवारी महिन्यात आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत रौप्य पदक पटकावताना भारताला आॅलिम्पिक कोट्यात स्थान मिळवून दिले होते.
(वृत्तसंस्था)