रायझर्सचे ‘तगडे’ आव्हान

By Admin | Updated: May 3, 2015 00:06 IST2015-05-03T00:06:56+5:302015-05-03T00:06:56+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या २८ चेंडूंत ६१ धावांच्या आतषबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जपुढे १९३ धावांचे तगडे आव्हान उभे केले.

Rijers' 'Toddy' Challenge | रायझर्सचे ‘तगडे’ आव्हान

रायझर्सचे ‘तगडे’ आव्हान

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नरच्या २८ चेंडूंत ६१ धावांच्या आतषबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जपुढे १९३ धावांचे तगडे आव्हान उभे केले. धवनने ३७ धावांची खेळी करीत योगदान दिले. ‘टॉप’ वर असलेल्या चेन्नईविरुद्ध हैदराबादला विजयाची गरज आहे. त्यामुळे सनरायर्झच्या फलंदाजांनी पूर्ण ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २० षटकांत २० बाद १९२ धावा केल्या.
येथील राजीव गांधी स्टेडियमवरील या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या या निर्णयाला सनरायर्झच्या सलामीवीरांनी आव्हान दिले. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने चौफेर फटकेबाजी करीत पहिल्या गड्यासाठी ८६ धावांची दमदार भागीदारी केली. या धावा त्यांनी अवघ्या ८.१ षटकांत काढल्या. धवन दुर्दैवीपणे धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. त्यानंतर नव्याने आलेल्या हेनरिक्सने धावांचा सपाटा लावला. त्याने अवघ्या ९ चेंडूंत १९ धावा चोपल्या. यामध्ये २ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. घातक ठरू पाहणाऱ्या हेनरिक्सचा अखेर नेगीने अडथळा दूर केला. धोनीने त्याचा झेल टिपला. त्या आधी, वॉर्नरने अवघ्या २० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ‘पार्ट टाईम’ गोलंदाज सुरेश रैनाने वॉर्नरला तंबूत पाठवण्याची कमाल केली. तो स्मिथकरवी झेलबाद झाला. ६१ धावांच्या खेळीत वॉर्नरने ११ चौकार आणि एक षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर इयान मोर्गन (नाबाद ३२) आणि नमन ओझा (२०) या जोडीने शानदार फटकेबाजी केली. ओझाला नेहराने त्रिफळाचित केले. एका बाजूने आशिष रेड्डी (६), विहारी (८) हे बाद झाले तर दुसऱ्या बाजूने मोर्गनने फटकेबाजी सुरू ठेवली त्यामुळे सनरायझर्सने १९२ धावसंख्येपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्जकडून ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ३, तर आशिष नेहरा, सुरेश रैना आणि पी. नेगी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Web Title: Rijers' 'Toddy' Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.