सही रे साई! पटकावले थायलंड ओपनचे विजेतेपद
By Admin | Updated: June 4, 2017 18:50 IST2017-06-04T17:03:38+5:302017-06-04T18:50:59+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढतीची देशात चर्चा असताना भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणिथने थायलंडमध्ये

सही रे साई! पटकावले थायलंड ओपनचे विजेतेपद
>ऑनलाइन लोकमत
बँकॉक, दि. 4 - एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढतीची देशात चर्चा असताना भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणिथने थायलंडमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. साईप्रणिथने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत थायलंड ओपममध्ये पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला आहे. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत त्याने जोनाथन क्रिस्टलवर 17-21, 21-18, 21-19 अशी मात केली.
भारताचा साईप्रणिथ आणि इंडोनेशियाचा जोनाथन क्रिस्टल यांच्यात झालेली थायलंड ओपनच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. मात्र पहिल्या गेममध्ये 17-21 अशा फरकाने पराभूत होऊन पिछाडीवर पडलेल्या साईने जबरदस्त खेळ करून लढतीत पुनरागमन केले. साईने दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये क्रिस्टलवर 21-18 आणि 21-19 असे विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. यंदाच्या वर्षातील साईचे हे तिसरे विजेतेपद ठरले आहे.