रिद्धिमान साहा उपयुक्त खेळाडू : कोहली
By Admin | Updated: November 19, 2015 04:48 IST2015-11-19T04:48:32+5:302015-11-19T04:48:32+5:30
यष्टिरक्षक रिद्धिमान साहा हा अत्यंत उपयुक्त खेळाडू असून, त्याची संघात मोठी भूमिका आहे. मला त्याचे हावभाव आणि खेळ आवडत असल्याने त्याला संघात खेळविणे योग्य असल्याचे
रिद्धिमान साहा उपयुक्त खेळाडू : कोहली
बंगळुरू : यष्टिरक्षक रिद्धिमान साहा हा अत्यंत उपयुक्त खेळाडू असून, त्याची संघात मोठी भूमिका आहे. मला त्याचे हावभाव आणि खेळ आवडत असल्याने त्याला संघात खेळविणे योग्य असल्याचे माझे मत आहे. सातव्या स्थानावर खेळून दडपण झुगारण्यात, तसेच वेगवान गोलंदाजांचा सामना करीत धावा काढण्यात रिद्धमानचा हातखंडा असल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
भारतीय संघात बदल नाही : द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात बदल न करण्याचा निर्णय राष्ट्रीय निवड समितीने बुधवारी घेतला. आज येथे सिनिअर निवड समितीची बैठक झाली. तिसरा सामना नागपुरात २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होईल. चौथा सामना नवी दिल्लीत ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार असला, तरी या सामन्यासाठी प्रशासनाची डीडीसीएला अद्याप परवानगी मिळाली नसल्याने आयोजनाबाबत शंका कायम आहे. (वृत्तसंस्था)
पुढील दोन सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, वरुण आरोन, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी आणि गुरकीरतसिंग मान.