भारताविरुद्ध खेळून निवृत्ती घेऊ : मिसबाह
By Admin | Updated: July 26, 2015 23:56 IST2015-07-26T23:56:37+5:302015-07-26T23:56:37+5:30
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यावर असलेला पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाह उल हक याने पुढील वर्षाअखेरीस भारताविरुद्ध

भारताविरुद्ध खेळून निवृत्ती घेऊ : मिसबाह
नवी दिल्ली : आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यावर असलेला पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाह उल हक याने पुढील वर्षाअखेरीस भारताविरुद्ध बहुप्रतीक्षित मालिका झाल्यास आपण निवृत्ती घेऊ शकतो, असे सांगितले.
मिसबाहने सांगितले, ‘‘माझ्यामध्ये खूप क्रिकेट बाकी आहे हे मला चांगल्या रीतीने माहिती आहे. तथापि, मी आणखी काही कसोटी सामने खेळू इच्छितो आणि मी क्रिकेटनंतर माझ्या जीवनाविषयीही विचार करीत आहे; परंतु ही माझी योजना आहे. जर भारताविरुद्ध मालिका झाल्यास ही मालिका खेळण्याची माझी इच्छा आहे
आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ इच्छितो. भारताविरुद्धची मालिका माझी अखेरची मालिका असू शकते.’’ मिसबाहने ५२ कसोटीत ४ हजार धावा आणि १६२ वनडेत ५ हजार १२२ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)