विश्रांतीचा दिवसच जास्त तणावपूर्ण

By Admin | Updated: November 17, 2014 02:14 IST2014-11-17T01:45:48+5:302014-11-17T02:14:58+5:30

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा पूर्वार्ध काल संपन्न झालाय आणि आजचा दिवस विश्रांतीचा आहे. विश्रांतीचा दिवस हाच सर्वसाधारणपणे सर्वांत जास्त तणावपूर्ण आणि व्यस्त असतो.

The rest day is more stressful | विश्रांतीचा दिवसच जास्त तणावपूर्ण

विश्रांतीचा दिवसच जास्त तणावपूर्ण

जयंत गोखले,
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा पूर्वार्ध काल संपन्न झालाय आणि आजचा दिवस विश्रांतीचा आहे. विश्रांतीचा दिवस हाच सर्वसाधारणपणे सर्वांत जास्त तणावपूर्ण आणि व्यस्त असतो. पहिल्या सहा डावांमध्ये कार्लसनने ३.५ गुण मिळवून आनंदवर एका गुणाने आघाडी संपादन केली आहे. अर्थात, काल जर आनंद २६ वी चाल ठ७ी२ अशी खेळली असता, तर आजचे चित्र पूर्णपणे वेगळे असते...!
जागतिक बुद्धिबळाच्या या दोन खेळाडूंमधील लढतीत काळी मोहरी घेऊन विजय नोंदविल्यास तो एक सनसनाटी निकाल समजला जातो. खरंतर, जो कुणी जगज्जेता असेल किंवा होऊ पाहत असेल त्याच्याकडून सर्व बुद्धिबळ जगतालाच परिपूर्णतेची अपेक्षा असते आणि त्यामुळेच या दोन्ही खेळाडूंमधल्या लढतीत जो खेळाडू काळी मोहरी घेऊन विजय नोंदवितो त्याचे पारडे कमालीचे जड होत असते. बॅडमिंटन-टेनिस यांसारख्या खेळात स्वत:ची री१५्रूी गमाविण्यासारखे हे समजले जाते.
आजमितीस आणि सर्व कसोट्या लावून हे दोन्ही खेळाडू सर्वोत्तम गणले जात आहेत. पाचवेळा विश्वविजेता ठरलेला, सर्वांत जास्त वेळा ‘बुद्धिबळ आॅस्कर’ हा सर्वोच्च बहुमान मिळविलेला, सर्व प्रकारच्या ऋङ्म१ें३२ मध्ये विश्वविजेतेपद पटकावलेला आणि उपलब्ध असलेल्या सर्वच्या सर्व स्पर्धा किमान एकदा तरी जिंकलेला, असा ‘आव्हानवीर’ आनंद आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय तो आजचा विश्वविजेता आणि असामान्य प्रतिभा आणि स्मरणशक्तीचे उपजत वरदान लाभलेला मॅग्नस कार्लसन! पहिल्या ६ डावांमधल्या त्यांच्या चालींचा ठोकताळा बांधणे हे सर्वसामान्य खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. केवळ ढोबळमानाने बोलायचे म्हटले, तर पहिल्या सहा डावांतून गुणांच्या स्वरूपात जरी कार्लसनने आघाडी मिळविली असली, तरी एकूण तयारीचा विचार करता, आनंद कार्लसनपेक्षा चार पावले पुढे आहे, हे समजून येतंय. ओपनिंगच्या खेळ्यांची आनंदची विविधता, त्यातल्या विविध पद्धतींचा खोलवर केलेला अभ्यास ह्या आनंदच्या जमेच्या बाजू आहेत आणि कार्लसनलादेखील या गोष्टींचा पुरेपूर अंदाज आला असावा, कारण आनंदच्या ओपनिंगपुढे कार्लसन कच खाताना आढळून येतोय.
कार्लसनच्या संघातील सदस्य मागच्या वेळेसारखेच ‘अज्ञान’ आहेत. तर आनंदच्या संघात दोन पोलिश ग्रँडमास्टर्स व भारतीय ग्रँडमास्टर शशिकिरणचा अंतर्भाव आहे. आनंदच्यासाठी थोडीशी धक्कादायक घटना म्हणजे, त्याच्या संघातला एक विश्वसनीय खेळाडू आणि आनंदचा घनिष्ट मित्र पीटर नेल्सन यावेळी मॅग्नस कार्लसनच्या साथीला आहे. अर्थात, आनंदला याची खूप आधिपासूनच कल्पना होती. त्यामुळे त्याच्या डावपेचांवर या गोष्टींचा फरक पडला नसणार! उद्या, सोमवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पहिल्या डावात आनंदला काळी मोहरी घेऊन खेळायचे आहे.

Web Title: The rest day is more stressful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.