नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांत तणाव वाढला. यावर अभिनव बिंद्राने पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, हा निर्णय सरकार घेईल आणि सरकारच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे सांगितले. तो म्हणाला, राजकारणाला खेळापासून दूर ठेवायला हवे. हाच एक चांगला विचार आहे. आॅलिम्पिक भावनाही तीच आहे. मात्र, आज वास्तविकतेत कधी कधी असे होत नाही. परिस्थिीतीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचाही आदर करायला हवा. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर धडा शिकवण्याचा वेगवान प्रयत्न सुरू केला आहे. याचा परिणाम खेळसंबंधांवरही झाला आहे.
सरकारच्या निर्णयाचा आदर करा : बिंद्रा
By admin | Updated: October 16, 2016 02:51 IST