शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

याेग्यप्रकारे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढा, ‘डीजीसीए’चे निर्देश, विमान कंपन्या, विमानतळ संचालकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:55 IST

देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.

मुंबई :विमान प्रवासादरम्यान याेग्यप्रकारे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरविण्याचे स्पष्ट निर्देश ‘डीजीसीए’ने सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत. काेराेना नियमावलींचे काटेकाेर पालन करण्याच्या सूचनाही विमान कंपन्यांना दिल्या आहेत. (Remove passengers who do not wear masks properly, DGCA instructions, airlines, airport directors)देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. विमानतळ परिसरात तसेच विमानाच्या आत याेग्यप्रकारे मास्क न घालणे तसेच साेशल डिस्टन्सिंगचे पालन प्रवाशांकडून हाेत नसल्याचे ‘डीजीसीए’च्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमान कंपन्या तसेच विमानतळ संचालकांनाही ‘डीजीसीए’ने परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.वारंवार सूचना देऊनही प्रवाशांनी याेग्यप्रकारे मास्क न घातल्यास त्यांना विमानातून उतरविण्यात यावे तसेच अशा प्रवाशांवर ‘अनरुली’ प्रवासी म्हणून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश ‘डीजीसीए’ने दिले आहेत.स्पष्ट सूचना -काेरेाना नियमावलीनुसार प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश केल्यापासून प्रवास पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत याेग्यप्रकारे मास्क घालणे आवश्यक आहे. नाकाच्या खाली मास्क घालू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळairplaneविमान