संबंध संपुष्टात येणार!

By Admin | Updated: October 19, 2014 01:25 IST2014-10-19T01:25:07+5:302014-10-19T01:25:07+5:30

नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे.

The relationship will end! | संबंध संपुष्टात येणार!

संबंध संपुष्टात येणार!

भारत - वेस्ट इंडीज : द्विपक्षीय क्रिकेट थांबवण्याचा विचार
मुंबई : वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडून माघार घेतल्यामुळे नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे. विंडीज बोर्डावरील कारवाईचा व नुकसानभरपाईच्या रकमेबाबत 21 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणा:या बीसीसीआय कार्यसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे.
मनधरणी केल्यानंतर विंडीजचे खेळाडू शुक्रवारी धर्मशाला येथे चौथ्या सामन्यासाठी मैदानात दाखल झाले. त्यांनी दौ:यातील उर्वरित सामन्यातून माघार घेणार असल्याचे बीसीसीआयला कळविले. आता बीसीसीआय विंडीज बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. बोर्डाच्या काही सदस्यांच्या मते, विंडीज क्रिकेट बोर्डाने दौरा अध्र्यावर सोडून रद्द केल्यामुळे बीसीसीआयपुढे अडचण निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होणो आवश्यक आहे. भविष्यात विंडीजविरुद्ध कुठल्याही मालिकेचे आयोजन टाळावे व आयपीएलमध्ये विंडीजच्या खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखावे. अनेक सदस्यांच्या मते, यात खेळाडूंचा दोष नसून त्यांना शिक्षा करण्यात येऊ नये. बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर म्हणाले, बोर्डाने कॅरेबियन संघासोबतचे सर्व नाते संपवावे. बीसीसीआयने त्यांची मनधरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वेतनाच्या मुद्दय़ावर खेळाडू खेळण्यास तयार नव्हते. मानधनाच्या मुद्दय़ावर खेळाडूंबाबत वाईट वाटते, पण विरोध करण्याचा हा प्रकार योग्य नव्हता, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
कार्यसमितीच्या सदस्यांच्या चर्चेनंतर विंडीजविरुद्ध भविष्यातील दौरे (एफटीपी) कायम ठेवायचा अथवा नाही, याबाबत निर्णय होईल. तसेच आम्ही नुकसानभरपाईची मागणी करणार असून, याची तक्रार आयसीसीकडे करणार आहोत. आम्ही कार्यसमितीची तातडीची बैठक बोलावली असून, त्यात या प्रकरणासह श्रीलंका संघाच्या दौ:याबाबत चर्चा होणार आहे.
- संजय पटेल, सचिव बीसीसीआय

 

Web Title: The relationship will end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.