फिफा सोबतचे संबंध नोबेल केंद्राने तोडले
By Admin | Updated: June 17, 2015 02:08 IST2015-06-17T02:08:19+5:302015-06-17T02:08:19+5:30
येथील नोबेल शांती केंद्राने फिफासोबत संबंध विच्छेदाची घोषणा केली आहे.

फिफा सोबतचे संबंध नोबेल केंद्राने तोडले
ओस्लो : येथील नोबेल शांती केंद्राने फिफासोबत संबंध विच्छेदाची घोषणा केली आहे.
फिफामधील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नोबेल केंद्र आणि फिफा २०१२ पासून सर्व सहभागी संघांचे कर्णधार आणि अधिकाऱ्यांदरम्यान ‘हॅण्डशेक फॉर पीस’या मोहिमेचे भागीदार होते. नोबेल शांती पुरस्कार देणाऱ्या नोबेल समितीच्या बोर्ड
संचालकांच्या व्यवस्थापन समितीने संबंध मोडीत काढण्याचे आदेश दिले होते. फीफाबरोबरचा हा करार २.२ कोटी रुपयांचा होता, जो रद्द करण्यात आला आहे.
नोबेल शांती केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात असे नमूद केले आहे, की फीफाबरोबरचे संबंध जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर संपुष्टात आणावेत. याच्या मागील कारणे संस्थेच्या वतीने देण्यात आलेली नाहीत. फीफाने
या संबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
सध्याच्या परिस्थितीत संस्था नॉर्वेजियन फुटबॉल संघासोबत ‘हॅण्डशेक’ अभियानाला पुढे वाढवण्याचा विचार करीत आहे. फीफाबरोबरचा करार संपुष्टात आणण्यासाठी संस्थेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
(वृत्तसंस्था)