विश्वविक्रमाची नोंद!
By Admin | Updated: March 12, 2015 00:32 IST2015-03-12T00:32:48+5:302015-03-12T00:32:48+5:30
लंकेचा यष्टिरक्षक- फलंदाज कुमार संगकारा याने वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विश्वचषकातही सलग चार शतकांची नोंद

विश्वविक्रमाची नोंद!
होबार्ट : लंकेचा यष्टिरक्षक- फलंदाज कुमार संगकारा याने वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विश्वचषकातही सलग चार शतकांची नोंद करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. स्कॉटलंडविरुद्ध त्याने बुधवारी १२४ धावा करीत हा विक्रम नोंदविला.
याआधी जहीर अब्बास, सईद अन्वर, हर्षल गिब्स, एबी डिव्हिलियर्स, क्वीनटन डिकॉक आणि रॉस टेलर यांनी लागोपाठ तीन शतके ठोकली आहेत. संगकारा या सर्वांच्या पुढे निघून गेला. विश्वचषकात संगकाराच्या आधी मार्क वॉ १९९९६, सौरव गांगुली २००३ आणि मॅथ्यू हेडन २००७ यांनी एका विश्वचषकात प्रत्येकी तीन शतके ठोकली होती. एखाद्या वन डे स्पर्धेत अथवा विश्वचषकात फलंदाजांनी तीन शतके ठोकली, पण चार शतके झळकविणारा संगकारा पहिलाच फलंदाज ठरला. या खेळीदरम्यान संगकाराने आॅस्ट्रेलियात २००० धावादेखील पूर्ण केल्या. डेस्मंड हेन्स याच्या ३०६७ आणि विवियन रिचर्ड्सच्या २७६९ धावा असून, संगकाराने आतापर्यंत येथे २०३८ धावा केल्या. त्याने आॅस्ट्रेलियात स्वत:चे पाचवे वन डे शतकही साजरे केले. लंकेकडून हा नवा विक्रम ठरला. सध्याच्या विश्वचषकात सर्वाधिक ४९६ धावा त्याच्याच नावावर आहेत. दिलशान ३९५ दुसऱ्या, तसेच शिखर धवन ३३३ धावांवर तिसऱ्या स्थानावर आहे. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ६७३ धावा केल्या होत्या. संगकाराने आज कारकिर्दीतील २५ वे शतक गाठले. वन डे त त्याच्यापेक्षा जास्त शतके सचिन ४९, रिकी पाँटिंग ३० आणि
सनथ जयसूर्या २८ यांच्या
नावावर आहेत. दिलशानने २२ वे वन डे शतक ठोकून गांगुली, गिब्स, गेल आणि कोहली यांच्याशी बरोबरी साधली.