चॅम्पियन्स ट्रॉफीत हार्दिक पंड्याच्या नावे झाला हा विक्रम
By Admin | Updated: June 18, 2017 23:38 IST2017-06-18T23:38:24+5:302017-06-18T23:38:24+5:30
भारताकडून एकट्या हार्दीक पंड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत हार्दिक पंड्याच्या नावे झाला हा विक्रम
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 399 धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुरती ढेपाळली. रथी-महारथी फलंदाज एका मागोमाग एक हजेरी लावत परत तंबूत गेले. भारताकडून एकट्या हार्दीक पंड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पंड्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. पंड्याने 32 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कार्दिकर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटकेबाजी करुन भारतीय संघाला सावरण्याचा प्रयत्न करणारा हार्दिक पंड्या चोरटी धाव घेताना धाव बाद झाला त्याने चार चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने 43 चेंडूत 76 धावांची खेळी केली.
कप्तान कोहली 5, रोहित शर्मा 0, धोनी 4 , शिखर 21 आणि युवराज 22 धावांवर बाद झाले. आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय चाहत्यांनी कानपूरमध्ये रस्त्यावर उतरत भारतीय खेळाडूंचे पोस्टर्स जाळले तसेच टिव्ही सेटही फोडले.