दोन सट्टेबाजांचा रिमांड मान्य
By Admin | Updated: May 12, 2015 00:31 IST2015-05-12T00:31:26+5:302015-05-12T00:31:26+5:30
दिल्लीच्या एका न्यायालयाने आयपीएल, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्याबद्दल अटक झालेल्या दोन आरोपींना रिमांडवर देण्याच्या

दोन सट्टेबाजांचा रिमांड मान्य
नवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने आयपीएल, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्याबद्दल अटक झालेल्या दोन आरोपींना रिमांडवर देण्याच्या याचिकेला अनुमती दिली आहे. रितेश बंसल ऊर्फ भरत व अंकुश बंसल या दोघांना आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतील सट्टेबाजीचा करोडो पैशांचा हवाला व्यवहार आणि मनी लॉड्रिंगच्या चौकशीसाठी अटक करण्यात आली होती.
या दोन्ही आरोपींना महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी आरोपींवर हवालामार्फत विदेशात पैसा पाठवण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ट्रांजीट रिमांडवर देण्याची विनंती मान्य केली असून, १३ मे रोजी या आरोपींना गुजरातमधील संबंधित न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील एन. के. मट्टा यांनी न्यायालयाला सांगितले, की सध्या करोडो रुपयांचा कथित हवाला
रैकेट सुरु असून, आॅनलाइन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज रॅकेटविषयी अत्यंत गुप्तपणे तक्रार दाखल केली आहे. (वृत्तसंस्था)