कानपूर वन डेत खेळाडूंचे स्वागतास चाहते सज्ज

By Admin | Updated: October 9, 2015 04:26 IST2015-10-09T04:26:56+5:302015-10-09T04:26:56+5:30

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ आॅक्टोबरला येथे होणाऱ्या पहिल्या वन डेची पूर्ण तयारी झाली आहे आणि आवडत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी कानपूरचे क्रिकेट

Ready to welcome fans of Kanpur Van Das | कानपूर वन डेत खेळाडूंचे स्वागतास चाहते सज्ज

कानपूर वन डेत खेळाडूंचे स्वागतास चाहते सज्ज

कानपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ आॅक्टोबरला येथे होणाऱ्या पहिल्या वन डेची पूर्ण तयारी झाली आहे आणि आवडत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी कानपूरचे क्रिकेट रसिक सज्ज झाले आहेत.
दोन्ही संघांदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ग्रीनपार्क मैदानावर खेळवला जाणार आहे. शुक्रवारी भारत व दक्षिण आफ्रिकेचा संघ सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी चार्टर्ड विमानाने लखनौच्या चौधरी चरणसिंह विमानतळावर उतरेल आणि त्यानंतर रस्त्याच्या मार्गाने कानपूरला येईल.
शनिवारी दोन्ही प्रतिस्पर्धी संघ ग्रीनपार्कवर सराव करणार आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनुसार या मैदानावर जवळपास दोन वर्षांनंतर होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था असेल. कटक येथील घटनेतून धडा घेताना ग्रीनपार्क स्टेडियमवरील सर्वच गॅलऱ्या १० फूट उंच जाळीने झाकल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक कोणतीही वस्तू मैदानावर फेकू शकणार नाहीत. प्रेक्षकांना सामन्यादरम्यान पाण्याची बाटली आणि पाऊच आणण्यावरही बंदी असेल. प्रेक्षक फक्त कागदाच्या कपातून पाणी पिऊ शकतील. (वृत्तसंस्था)

Web Title: Ready to welcome fans of Kanpur Van Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.