घरच्या मैदानावर मुंबई विजयासाठी सज्ज

By Admin | Updated: October 18, 2014 00:40 IST2014-10-18T00:40:26+5:302014-10-18T00:40:26+5:30

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विजयी ट्रॅक पकडण्यासाठी उत्सुक असलेला मुंबई सिटी एफसी शनिवारी घरच्या मैदानावर पहिली लढत खेळणार आहे.

Ready for victory at home ground | घरच्या मैदानावर मुंबई विजयासाठी सज्ज

घरच्या मैदानावर मुंबई विजयासाठी सज्ज

स्वदेश घाणोकर - मुंबई
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विजयी ट्रॅक पकडण्यासाठी उत्सुक असलेला मुंबई सिटी एफसी शनिवारी घरच्या मैदानावर पहिली लढत खेळणार आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई गुणांचे खाते उघडण्यासाठी एफसी पुणो सिटी संघाशी भिडणार आहे. या लढतीत त्यांना कर्णधार सय्यद रहिम नबी याची उणीव नक्की जाणवेल. दुखापतीमुळे त्याला तीन आठवडय़ांच्या विo्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
आयएसएलच्या पहिल्याच लढतीत मुंबईला अॅटलेटिको डी कोलकाता संघाने धूळ चारली होती. मुंबईचा बचाव इतका ढिसाळ होता, की कोलकाताला विजय मिळवण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागले नाही. दुसरीकडे पुणो संघाने दिल्लीविरुद्ध जबरदस्त बचावाचा नजराणा पेश करून सामना गोलशून्य राखला होता. त्यामुळे शनिवारच्या या लढतीत मुंबईच्या बचावफळीची कसोटी लागणार आहे. तरीही घरच्या प्रेक्षकांसमोर मुंबईचा संघ सकारात्मक दृष्टिकोनातून उतरणार आहे.  पहिल्या सामन्यात स्वीडनचा फ्रेडी लुंगबर्ग आणि फ्रान्सचा निकोलस अनेल्का यांना मुकावे लागले होते आणि तरीही मुंबईच्या खेळाडूंनी 57 टक्के चेंडूवर ताबा ठेवला होता. पुणोविरुद्धच्या लढतीत लुंगबर्ग खेळण्याची आशा संघमालकांनी व्यक्त केली आहे. 
नबीच्या अनुपस्थितीत बचावाची जबाबदारी मॅन्युएल फ्रेड्रिक, दीपक मोंडल आणि पवेल सीमोव्स यांच्यावर असेल. जोहान लेटझेल्टर, पीटर कोस्टा आणि जॅन स्टोहांजल हे सेंटर मिडफिल्डवर असतील. लालरिंदीका राल्टे हा डावीकडून त्यांना मदत करेल, तर उजवीकडून नाडाँग भुतिआ आणि सिंघम सुभाष सिंह यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे फ्रेड्रिकच्या खांद्यावर जबाबदारीचा भार अधिक असल्याने त्याच्याकडून अप्रतिम खेळाची अपेक्षा चाहत्यांना आहे.  दुसरीकडे पुण्याने दिल्लीचे आक्रमण परतवून आपला दबदबा सिद्ध केला होता.  

 

Web Title: Ready for victory at home ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.