पर्थ : वाकाच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत भारताला १२ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज अॅरोन फिंचने म्हटले आहे.भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान वाकावर अखेरचा वन-डे सामना २००४ मध्ये खेळला गेला होता. त्या वेळच्या तुलनेत खेळपट्टीमध्ये बदल झाला असला तरी आमचा संघ आताही भारताला अडचणीत आणण्यास सक्षम आहे, असेही फिंच म्हणाला. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतासाठी मोठी बाब : बेलीपर्थ : आॅस्ट्रेलियन फलंदाज जॉर्ज बेली याने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया संघ सज्ज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलियन भूमीवर पाहुण्या संघाला विजय मिळवणे मोठी बाब असेल, असेही त्याने म्हटले. बेलीने मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी म्हटले, ‘‘आमचा समृद्ध इतिहास आणि भारताबरोबरची कडवी प्रतिस्पर्धा आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत भारत आणि येथे काही चुरशीचे सामने खेळले आहेत. (वृत्तसंस्था)
खेळपट्टीचा लाभ घेण्यास सज्ज : फिंच
By admin | Updated: January 11, 2016 03:22 IST