वचपा काढण्यास सज्ज

By Admin | Updated: April 30, 2015 01:33 IST2015-04-30T01:33:19+5:302015-04-30T01:33:19+5:30

अवघ्या दोन धावांनी पराभृूत झालेला कोलकाता नाइट रायडर्स गुरुवारी घरच्या मैदानावर चुकांपासून धडा घेत पराभवाचा वचपा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल हे निश्चित.

Ready to remove Vachpi | वचपा काढण्यास सज्ज

वचपा काढण्यास सज्ज

कोलकाता : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मंगळवारी झालेल्या कमी धावसंख्येच्या सामन्यात अवघ्या दोन धावांनी पराभृूत झालेला कोलकाता नाइट रायडर्स गुरुवारी घरच्या मैदानावर चुकांपासून धडा घेत पराभवाचा वचपा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल हे निश्चित. मंगळवारी येथे पावसाने हजेरी लावली. पुढील ४८ तासांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
केकेआरसाठी चेन्नईवर विजय मिळविणे इतके सोपे नाही. मंगळवारच्या पराभवाआधी केकेआरला हैदराबाद सनराइजर्सने देखील पराभूत केले आहे. यामुळे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेलेल्या या संघाला पुन्हा एकदा सांघिक खेळी करण्याची गरज भासेल. दुसरीकडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा चेन्नई संघ घरच्या मैदानावर विजयी पताका फडकवित असून आता बाहेर लय कायम राखण्यास इच्छुक आहे. धोनीची नेतृत्वक्षमता आणि अखेरपर्यंत हार न मानण्याच्या संघाच्या वृत्तीमुळेच केकेआरविरुद्ध १३४ धावांचा बचाव करीत आम्हाला हरविणे सोपे नाही हे, सुपरकिंग्जने दाखवून दिले.
केकेआरची मुख्य चिंता आहे ती फलंदाजी. या संघातील रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव आणि युसूफ पठाण यांना चांगली सुरुवात आणि मोठी खेळी करण्याचे आव्हान असेल. कर्णधार गंभीरने यंदा तीन अर्धशतके ठोकली पण गतसामन्यात तो भोपळा न फोडताच बाद झाला होता. शाकिब अल हसन हा बांगलादेशकडून खेळण्यास परतला व सुनील नरेन संशयित गोलंदाजीच्या फेऱ्यात अडकल्याने केकेआर काहीसे कमकुवत दिसतो. (वृत्तसंस्था)

केकेआरविरुद्ध क्षेत्ररक्षण करतेवेळी जखमी झालेला मुख्य फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीतही या संघाची गोलंदाजी भक्कम आहे. त्याची जागा पवन नेगी किंवा राहुल शर्मा यापैकी एक जण घेईल. दोन षटकांत १८ धावा मोजणारा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेची जागा मात्र इरफान पठाण घेऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज हाताला झालेल्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधील पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. मंगळवारी झालेल्या सामन्यात अश्विनच्या हाताला दुखापत झाली होती. चेन्नईचे संघव्यवस्थापक रसेल राधाकृष्णन म्हणाले, ‘अश्विनच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याला किती टाके बसलेत हे आम्हाला माहीत नाही. अश्विनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन सामन्यांत त्याला न खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स :
गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठान, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नरेन, उमेश यादव, मोर्नी मोर्केल, रेयॉन टेन डोएशे, अझहर मेहमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॅड हॉग, केसी करियप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीर प्रताप सिंग आणि वैभव रावल.
चेन्नई सुपर किंग्ज :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ब्रेंडन मॅक्युलम, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फाफ डु प्लेसिस, ईश्वर पांडे, मॅट हेन्री, मिथुन मन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अ‍ॅन्ड््यू टाये आणि एकलव्य द्विवेदी

Web Title: Ready to remove Vachpi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.