न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज
By Admin | Updated: July 2, 2017 00:12 IST2017-07-02T00:12:38+5:302017-07-02T00:12:38+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे न्यायालयातर्फे नियुक्ती प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पष्ट केले. यापूर्वीच्या

न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे न्यायालयातर्फे नियुक्ती प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पष्ट केले. यापूर्वीच्या एजीएममध्ये न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास
सदस्यांनी विलंब करण्याची रणनीती अवलंबली असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामधील काही बाबींवर विचार करण्यासाठी विशेष आमसभेने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना सीओएचे चेअरमन विनोद राय यांनी सांगितले की, ‘निराश होण्याचा किंवा न होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. विशेष आमसभेमध्ये कुठलाही निर्णय झाला असला, तरी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे.’
राय पुढे म्हणाले, ‘आमच्या सदस्यांमध्ये सहमती होत आहे, पण सर्वांचे एकमत झाले नाही, तरी आम्हाला आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. बीसीसीआयच्या सदस्यांचा शिफारशी लागू करण्यास विरोध असला, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.’
अनिल कुंबळे यांच्या स्थानी भारतीय सीनिअर संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया विचारली असता राय म्हणाले, ‘यात सीओएची कुठलीही भूमिका नाही. कारण, ही जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपविण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. मी या प्रक्रियेमध्ये सहभागी नाही.’
‘लावधी वाढविण्यात आला. याबाबत बोलताना राय म्हणाले, ‘कालावधी वाढविण्यात आल्याबाबत माझा कुठलाही आक्षेप नाही.’ (वृत्तसंस्था)