मेस्सीसोबत अर्जेंटिना बोस्रियासाठी सज्ज

By Admin | Updated: June 15, 2014 03:12 IST2014-06-15T03:12:11+5:302014-06-15T03:12:11+5:30

लियोनेल मेस्सी आकर्षण असलेला अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाचा पहिला सामना रविवारी ‘क’ गटात बोस्रिया-हर्जेगोविनाविरुद्ध खेळणार आहे.

Ready for Argentina bossia with Messi | मेस्सीसोबत अर्जेंटिना बोस्रियासाठी सज्ज

मेस्सीसोबत अर्जेंटिना बोस्रियासाठी सज्ज

रियो दी जेनेरियो : लियोनेल मेस्सी आकर्षण असलेला अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाचा पहिला सामना रविवारी ‘क’ गटात बोस्रिया-हर्जेगोविनाविरुद्ध खेळणार आहे.
बार्सिलोनाच्या २६ वर्षांच्या मेस्सीने गेल्या काही वर्षांत अनेक सन्मान मिळविले आहेत. पण, फुटबॉलच्या महाकुंभात त्याची कामगिरी फारशी चमकदार झालेली नाही. २००८ साली बीजिंगमध्ये आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या अर्जेंटिना संघाचा मेस्सी सदस्य होता, पण विश्वचषक आणि कोपा-अमेरिका चषक जिंकण्याचे भाग्य मिळाले नाही.
चार वेळेचा बॅलन डिओर पुरस्कार आणि बार्सिलोना संघासोबत तीन वेळा युरोपियन चॅम्पियन बनलेल्या मेस्सीच्या खेळावर कुणी शंका घेण्याचे कारण नाही़ पण, अर्जेंटिनासाठी कामगिरी करीत नसल्याने त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते. २००६ आणि २०१० च्या विश्वचषकात मेस्सीने काही केले नव्हते, पण २०१४ चा विश्वचषक मेस्सीच्या नावे असू शकतो. २००६ मध्ये १८ वर्षांच्या मेस्सीने सर्बिया-मोंटेनिग्रोविरुद्ध एकमेव गोल केला. २०१० मध्ये साढू दिहगो मॅरेडोना संघाचा प्रशिक्षक होता. त्याने ४-१-३-२ या डावपेचांतर्गत संघ उतरविल्याने मेस्सी दबावात आला होता.
या वेळी कोच अलेक्झांड्रो साबेला यांनी मेस्सीला चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सावधपणे संघ निवडला. साबेला यांनी मेस्सीला आघाडीला गांजोला हिगूएन आणि सर्जियो एगुहरो यांच्यासोबत स्थान दिले. चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये सामनावीर ठरलेला रियल माद्रिदचा अँजेल डी मारिया मिडफिल्डमध्ये सावध असेल. मेस्सीला प्रतिस्पर्धी बचावफळीने बांधून ठेवू नये, याची काळजी मारिया घेईल. अर्जेंटिना संघ ‘वन मॅन’ आर्मी असल्याचा ठपका कोचने खोडून काढला.

Web Title: Ready for Argentina bossia with Messi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.