आयओसी डोपिंग दोषी विजेत्यांवर कारवाईसाठी सज्ज

By Admin | Updated: August 4, 2015 00:44 IST2015-08-04T00:44:26+5:302015-08-04T00:44:26+5:30

आॅलिंपिक पदकविजेते खेळाडू डोपिंगच्या आरोपात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईस सज्ज असल्याचे आंतरराष्ट्रीय आॅलिंपिक समितीचे अध्यक्ष

Ready for action against guilty winners of IOC doping | आयओसी डोपिंग दोषी विजेत्यांवर कारवाईसाठी सज्ज

आयओसी डोपिंग दोषी विजेत्यांवर कारवाईसाठी सज्ज

क्वालालंपूर : आॅलिंपिक पदकविजेते खेळाडू डोपिंगच्या आरोपात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईस सज्ज असल्याचे आंतरराष्ट्रीय आॅलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले आहे.
२००१ ते २०१२ दरम्यान झालेल्या आॅलिंपिक आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्यांच्या रक्ताचे नमुने संशयास्पद आढळले त्याच धावपटूंनी रेस जिंकल्या, असा आरोप नुकताच झाला आहे. यावर बाक म्हणाले, ‘‘आरोपांचा तपास करणे विश्व डोपिंगविरोधी एजन्सीचे (वाडा) काम आहे. आॅलिंपिकच्या निकालाशी संबंधित प्रकरणे असतील तर आयओसी कारवाई करेल.’’ आॅलिंपिकचे जर्मन प्रसारक एआरडी आणि ब्रिटनचे वृत्तपत्र संडे टाइम्सने त्यांच्याकडे पाच हजार खेळाडूंच्या रक्ताच्या १२ हजार नमुन्यांचे निकाल असल्याचा दावा केला.

Web Title: Ready for action against guilty winners of IOC doping