(वाचली) तवनाप्पा पाटणे, सेंट झेविअर्स उपांत्य फेरीत - सतरा वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:46+5:302014-10-04T22:55:46+5:30
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा परिषद व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्य फेरी गाठली.

(वाचली) तवनाप्पा पाटणे, सेंट झेविअर्स उपांत्य फेरीत - सतरा वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
क ल्हापूर : जिल्हा क्रीडा परिषद व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्य फेरी गाठली.शनिवारी मेरी वेदर मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सेंट झेविअर्स हायस्कूल विरुद्ध ओरिएंटल स्कूल यांच्यात झाला. यामध्ये सेंट झेविअर्स विजयी झाले. तर दुसरा उपांत्यपूर्व सामना तवनाप्पा पाटणे हायस्कूल विरुद्ध शांतीनिकेतन यांच्यात झाला. तवनाप्पा पाटणे हायस्कूलने हा सामना ८ गडी राखून जिंकत उपांत्य फेरी गाठली. आज सकाळी दुसर्या गटामध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, सेव्हंथ डे हायस्कूल, न्यू हायस्कूल, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या गटातून दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.