(वाचली) क्रीडापानासाठी ... अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीची शाहूपुरी जिमखानावर मात - मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट चषक - साद मुजावरचे चार बळी
By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:48+5:302014-12-02T00:35:48+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित व स्वर्गीय मालती पाटील ट्रस्ट पुरस्कृत मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनिल सांगावकर अकॅडमीने शाहूपुरी जिमखाना संघावर २८ धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली.

(वाचली) क्रीडापानासाठी ... अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीची शाहूपुरी जिमखानावर मात - मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट चषक - साद मुजावरचे चार बळी
क ल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित व स्वर्गीय मालती पाटील ट्रस्ट पुरस्कृत मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनिल सांगावकर अकॅडमीने शाहूपुरी जिमखाना संघावर २८ धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली. शिवाजी स्टेडीयम येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सांगावकर अकॅडमीने ३९.५ षटकांत २०३ धावा केल्या. यामध्ये ऋषिकेश चौगुले ३६, आकाश करगावे २३, साहील जसवाल २३, वैष्णव संघमित्र १९, प्रथमेश बाजारी १३ धावा केल्या. शाहूपुरीकडून संदीप पाटील, साहील शिबे, आदित्य खानविलकर, नरसिंग शिंदे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी जिमखानाने ३७.४ षटकात सर्वबाद १७५ धावा केल्या. यामध्ये शुभम मेढे ३३, सिद्धार्थ कोठारी २७, इकबाल सुनंकद २६, मेहुल बुकशेठ १५, अक्षय पवार १५, आदित्य खानविलकरने ११ धावा केल्या. सांगावकर अकॅडमीकडून साद मुजावरने ४, करण सांगावकरने ३, अनिकेत नलवडेने २ व आकाश करगावेने एक बळी घेत शाहूपुरी जिमखाना संघाचा २८ धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.