(वाचले) दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांची विजयी सलामी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:59+5:302014-09-26T21:40:59+5:30
कोल्हापूर : चुरशीने खेळ करत दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांनी आज, शुक्रवारी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रकाश आर्टस्, स्पोर्टस् व कला सांस्कृतिक मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

(वाचले) दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांची विजयी सलामी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ
क ल्हापूर : चुरशीने खेळ करत दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांनी आज, शुक्रवारी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रकाश आर्टस्, स्पोर्टस् व कला सांस्कृतिक मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.येथील बागल चौकात सकाळी नऊ वाजता प्रकाश केसरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अजय माने, नीलेश धामणीकर, नितीन सोनटक्के, संदीप आढाव, मारुती साळोखे, चांद सय्यद, संतोष कणसे, सम्राट सरवडे, सुनील टिके, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, पंच आशिष बागकर, सूर्यकांत पाटील, विजय जाधव उपस्थित होते. स्पर्धेत आज झालेल्या प्राथमिक फेरीत दिलीप सांडगे, संदेश वाकळे, सुखबिरसिंग, किरण तिवारी, विजय कदम, गिरीष दळवी, राजेश कोरटकर, नईम अन्सारी, मंगेश पंडित, दीपक काशीद, मनोज दुधाणे यांनी विजय मिळविला. स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, मुंबई उपनगर, जळगांव व रायगड जिल्ांतून सुमारे ३९२ खेळाडू सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)