दिल्लीपुढे आरसीबीचे कडवे आव्हान
By Admin | Updated: April 17, 2016 03:37 IST2016-04-17T03:37:03+5:302016-04-17T03:37:03+5:30
किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध सहज विजयाची नोंद केल्याने उत्साही झालेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्सला आयपीएल नऊमध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कडव्या आव्हानास

दिल्लीपुढे आरसीबीचे कडवे आव्हान
बंगळुरु : किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध सहज विजयाची नोंद केल्याने उत्साही झालेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्सला आयपीएल नऊमध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कडव्या आव्हानास सामोरे जावे लागेल.
पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर दिल्लीने पंजाबवर आठ गड्यांनी विजय साजरा केला. आरसीबीनेदेखील सलामी लढतीत सनरायझर्स हैदराबादला ४५ धावांनी नमविले होते.
कागदावर बंगळुरु संघ तगडा वाटतो. त्यांच्याकडे स्टार्स खेळाडूंचा भरणा आहे. त्यात कर्णधार विराट कोहलीशिवाय ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन यांची नावे प्रमुख आहेत. याशिवाय युवा फलंदाज सर्फराजखान आणि स्थानिक क्रिकेटमध्ये धावा काढणाऱ्या केदार जाधवचाही समावेश आहे.
दिल्लीचे नेतृत्व अनुभवी झहीर खान करीत असून लेगस्पिनर अमित मिश्रा मॅचविनर गोलंदाज संघात आहे. डिव्हिलियर्स-कोहली यांची फटकेबाजी रोखण्यासाठी मिश्राचा शिताफीने वापर करण्याची झहीरकडे संधी असेल. बंगळुरु संघालादेखील वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सॅम्युअल बद्री याच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. त्याच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल आणि परवेझ रसूल यांनी चांगला मारा केला होता. दिल्लीकडून मागच्या सामन्यात क्विंटन डी कॉक याने नाबाद ५९ धावा ठोकल्या होत्या. त्याच्याशिवाय जेपी ड्युमिनी, करुण नायर, पवन नेगी आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्यावर विजयाची जबाबदारी असेल.
उभय संघ यातून निवडणार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री, इक्बाल अब्दुल्ला, श्रीनाथ अरविंद, केदार जाधव, विक्रमजित मलिक, केन रिचर्डसन, वरुण अॅरॉन, मनदीप सिंग, अबू नेचीम, अॅडम मिल्ने, मिशेल स्टार्क, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड व्हिसे, सचिन बेबी, लोकेश राहुल, परवेझ रसूल, विकास टोकस, प्रवीण दुबे आणि अक्षय कर्णेवार.
दिल्ली डेअर डेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कार्लोस बे्रथवेट, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नाथन कुल्टर नाइल, इम्रान ताहिर, महिपाल लोमरोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शहाबाज नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर आणि प्रत्युष सिंग.