आरसीबी-केकेआर लढत आज
By Admin | Updated: May 16, 2016 04:22 IST2016-05-16T04:22:08+5:302016-05-16T04:22:08+5:30
कोलकाता नाईट रायडर्स संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

आरसीबी-केकेआर लढत आज
कोलकाता : इंडियन प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वात प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेला माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे.
केकेआर संघाला गुणसंख्या १६ करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. त्यामुळे त्यांचा अंतिम चार संघांतील प्रवेश निश्चित होणार आहे. उभय संघांना अद्याप तीन सामने खेळायचे आहेत. सोमवारी विजय मिळवत गुणतालिकेतील आपल्या स्थानामध्ये सुधारणा करण्यास उभय संघ उत्सुक आहेत.
बॅँगलोर संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स शानदार फॉर्मात आहे. या दोघांनी शनिवारच्या लढतीत शतकी खेळी केली. या दोघांचा फॉर्म बघता गौतम गंभीरची फिरकीपटूंना संधी देण्याची रणनीती ‘फेल’ठरू शकते. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर गंभीर द. आफ्रिकन फलंदाज डिव्हिलियर्सला रोखण्यास प्रयत्नशील आहे. बॅँगलोरचा कर्णधार विराट कोहली ‘मास्टर फिनिशर’ आहे. दडपणाखाली तो शानदार फलंदाजी करतो. या सामन्याच्या निमित्ताने केकेआरची गोलंदाजी व आरसीबीची फलंदाजी यांच्यातील लढत अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
>प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, शकिबुल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नारायण, अंकित राजपूत, मोर्नी मॉर्कल, ख्रिस लिन, कोलिन मुन्रो, ब्रॅड हॉग, शॉन टेट, जेसन होल्डर, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, जयदेव उनादकट आणि राजागोपाल सतीश.
रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, लोकेश राहुल, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी, ख्रिस जॉर्डन, श्रीनाथ अरविंद, वरुण अॅरोन, यजुवेंद्र चाहल, ट्रेव्हिस हेड, केन रिचर्डसन, डेविड विसे, तबरेज शम्सी, अबु नेचिम, प्रवीण दुबे, इकबाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजीत मलिक, मंदीप सिंग, परवेज रसूल, हर्षल पटेल आणि विकास टोकस.