रवी शास्त्री प्रशिक्षक होण्याची शक्यता
By Admin | Updated: June 12, 2015 03:45 IST2015-06-12T03:45:07+5:302015-06-12T03:45:07+5:30
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या

रवी शास्त्री प्रशिक्षक होण्याची शक्यता
नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या (बीसीसीआय) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच शास्त्री यांच्याकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात येतील. विशेष म्हणजे जर, का असे झाले शास्त्री यांना वर्षाकाठी ७ कोटी रुपये इतकी घसघसीत कमाई मिळेल.
दरम्यान टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कालावधी याआधीच संपुष्टात आल्याने बीसीसीआय सध्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यास त्यांना वर्षाला बीसीसीआयकडून ७ कोटी रुपयांचा गलेल्लठ्ठ पगार मिळेल. आजपर्यंत टीम इंडियाच्या कोणत्याही प्रशिक्षकाला इतकी मोठी रक्कम मिळाली नसल्याने शास्त्री सर्वात महागडे भारतीय प्रशिक्षक ठरतील.
दरम्यान टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने बीसीसीआयला शास्त्री यांना संघाच्या डे्रसिंग रुममध्ये पाहण्यास आवडेल असे सांगितले असल्याची माहिती देखील मिळाल्याने या वृत्ताला अधिक जोड मिळत आहे. शिवाय यानंतर बीसीसीआयने देखील प्रशिक्षकाची शोध मोहिम थांबवली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे गतवर्षीच्या इंग्लंड दौऱ्यापासून शास्त्री यांची संघाच्या संचालक म्हणून नेमणूक केली होती व त्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा झालेली पाहायला मिळाली.
शास्त्री यांना समालोचक म्हणून बीसीआयकडून वर्षाकाठी चार कोटी रुपये मिळत होते. तर संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांना वर्षाला सहा करोड रुपये मिळू लागले. डंकन फ्लेचर यांना ४.५ कोटी वर्षाकाठी मिळत होते. (वृत्तसंस्था)