रत्नाकरनने झोंग झांगचा पराभव करीत केले उलटफेर

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:48+5:302015-08-03T22:26:48+5:30

Ratnakaran defeated Jhong Zhang | रत्नाकरनने झोंग झांगचा पराभव करीत केले उलटफेर

रत्नाकरनने झोंग झांगचा पराभव करीत केले उलटफेर

>अल आइन (यूएई): आंतरराष्ट्रीय मास्टर के. रत्नाकरनने मोठे उलटफेर करताना आशिया खंडातील बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या सातव्या मानांकित झोंग झांगचा पराभव करीत मोठे उलटफेर केले़ डावामध्ये अधिकांश समयी पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रत्नाकरनने जोरदार पुनरागमन करताना चीनच्या माजी खेळाडूला हरवले़ या विजयानंतर रत्नाकरनच्या नजरा अंतिम ग्रँडमास्टर नॉर्मवर टिकून आहेत़ महिला ग्रँडमास्टर कोनेरु हंपीला मात्र पहिल्या फेरीमध्ये किर्गिस्तानच्या एसिल अब्दयापरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले़ जागतिक तिसर्‍या क्रमांकाची महिला खेळाडू हा डाव ड्रॉवर सोडविली असती़ डी हरिकाने सीरियाच्या बाशेर आइतीला बरोबरीत रोखले़ हंपी आणि हरिका या दोन महिला खेळाडू अशा आहेत ज्यांनी महिला गटाऐवजी ओपन गटात भाग घेतला आहे़ यादरम्यान अव्वल मानांकित भारतीय खेळाडू विदित गुजरातीने बांगलादेशचा ग्रँडमास्टर इनामुल हुसेनचा पराभव करीत शानदार सुरुवात केली़ कृष्णन शशिकिरणने कझाकिस्तानच्या पेत्र कोस्तेनकोला हरवले़

Web Title: Ratnakaran defeated Jhong Zhang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.