रणजी विदर्भ जोड
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:23+5:302015-02-08T00:19:23+5:30
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे विदर्भाची अवस्था १ बाद ६ वरून २ बाद १५ धावा अशी झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गणेश सतीश (५) याला डॉम्निक जोसेफने मोटवानीकरवी झेलबाद करीत तिसरा झटका दिला. शलभ श्रीवास्तव (०) एन.आर. धुमाळच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यामुळे विदर्भाची अवस्था ४ बाद २२ अशी बिकट झाली.

रणजी विदर्भ जोड
त यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे विदर्भाची अवस्था १ बाद ६ वरून २ बाद १५ धावा अशी झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गणेश सतीश (५) याला डॉम्निक जोसेफने मोटवानीकरवी झेलबाद करीत तिसरा झटका दिला. शलभ श्रीवास्तव (०) एन.आर. धुमाळच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यामुळे विदर्भाची अवस्था ४ बाद २२ अशी बिकट झाली. कर्णधार एस. बद्रिनाथ (२७) व फैज फझल (२६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत मुंढेने बद्रिनाथला पायचीत करून ही जोडी फोडली. पाठोपाठ फझल देखील डॉम्निकच्या गोलंदाजीवर मोटवानीकडे झेल देऊन परतला. त्यामुळे पाच बाद ६९ वरून विदर्भ ची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली. त्यानंतर तळाचे रवी जांगीड (११), श्रीकांत वाघ (०), रवी ठाकूर (४) व स्वप्नील बंडीवार (५) झटपट बाद झाले. तर राकेश ध्रुव याने नाबाद १५ धावा केल्या. डॉम्निकने ५,श्रीकांत मुंढे ३, समद फल्ला व एन. आर. धुमाळने प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावांत १३ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या असून, फैज फजल (१४) व सचिन कटारिया (१२) खेळत आहेत. धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव : १०८.३ षटकांत सर्वबाद ३४२ धावा, स्वप्नील गुगळे ७६, हर्षद खडीवाले २०, रोहित मोटवानी ३८, केदार जाधव ९, अंकित बावणे नाबाद १००, राहुल त्रिपाठी ४३, चिराग खुराना ५, श्रीकांत मुंढे १३, समद फल्ला १०, रवी ठाकूर ३/९४, श्रीकांत वाघ २/७७, स्वप्नील बंडीवार २/८५, राकेश ध्रुव १/५८, फैज फजल १/१५. विदर्भ : पहिला डाव : सचिन कटारिया ७, उर्वेश पटेल ३, एस. बद्रिनाथ २७, शलभ श्रीवास्तव ०, फैज फझल २६, रवी जांगिड ११, राकेश ध्रुव नाबाद १५, डॉम्निक जोसेफ मुथुस्वामी ५/१९, श्रीकांत मुंढे ३/१४, समद फल्ला १/१८, एन. आर. धुमाळ १/५०. विदर्भ दुसरा डाव : १३ षटकांत २६ धावा, फैज फजल १४, सचिन कटारिया १२.