रणजी करंडक
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:16+5:302015-02-11T00:33:16+5:30
रणजी करंडक स्पर्धेचे बाद फेरीचे वेळापत्रक जाहीर

रणजी करंडक
र जी करंडक स्पर्धेचे बाद फेरीचे वेळापत्रक जाहीरउपांत्यपूर्व फेरी : विदर्भ-तामिळनाडू, महाराष्ट्र-आंध्रप्रदेश, मुंबई-दिल्ली, कर्नाटक-आसामनवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेत बाद फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून १६ फेब्रुवारीपासून विविध केंद्रांवर उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत गतविजेता कर्नाटक संघाला आसामच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत इंदूर येथे होणार आहे. दिल्ली व मुंबई संघांदरम्यान कटक येथे उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. जयपूर येथे विदर्भाची लढत तामिळनाडूविरुद्ध होणार असून लाहलीमध्ये महाराष्ट्र व आंध्रप्रदेश संघादरम्यान सामना होईल.बीसीसीआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार उपांत्य फेरीच्या लढती २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत बेंगळुरू व कोलकाता येथे रंगणार आहे. पहिल्या व दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेते संघ बेंगळुरू येथे तर तिसऱ्या व चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेते संघ कोलकाता येथे खेळतील. मुंबई येथे ८ मार्च रोजी अंतिम सामना रंगणार आहे. सर्व सामन्यांचे थेट प्रसारण होणार आहे. (वृत्तसंस्था)