IPL मधून रमण यांची विकेट, सीओओ पदाचा राजीनामा दिला
By Admin | Updated: November 3, 2015 12:57 IST2015-11-03T12:57:03+5:302015-11-03T12:57:16+5:30
आयपीएल फिक्सिंगप्रकरणी न्या. लोढा समितीच्या चौकशीला सामोरे गेलेले आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सुंदर रमण यांनी राजीनामा दिला आहे.

IPL मधून रमण यांची विकेट, सीओओ पदाचा राजीनामा दिला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - आयपीएल फिक्सिंगप्रकरणी न्या. लोढा समितीच्या चौकशीला सामोरे गेलेले आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सुंदर रमण यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीसीआयनेही सुंदर रमण यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
न्या. लोढा समितीनी फिक्सिंग प्रकरणात सुंदर रमण यांचीही चौकशी केली होती. या प्रकरणात चौकशी झाल्यावरही रमण यांना आयपीएलच्या सीओओ पदावर कायम ठेवण्याच्या निर्णयावर नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर नाराज होते. मनोहर यांनीच रमण यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत राजीनामा द्यायला सांगितले होते असे सूत्रांनी सांगितले. सोमवारी रमण यांनी नागपूरमध्ये शशांक मनोहर यांची भेट घेत राजीनामा सादर केला. रमण यांचा राजीनामा स्वीकारल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. मात्र राजीनाम्याचे नेमके कारण काय होते याविषयी बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.