राज्य लॉन टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी राजीव देसाई

By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:52+5:302014-09-11T22:30:52+5:30

सोलापूर: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आह़े मुंबई येथील राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देसाई यांची सन 2014-2018 या कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अँड़ मोहन खटावकर यांनी जाहीर केल़े सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष शरद कन्नमवार होत़े

Rajiv Desai, Deputy Governor of State Lawn Tennis Association | राज्य लॉन टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी राजीव देसाई

राज्य लॉन टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी राजीव देसाई

लापूर: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आह़े मुंबई येथील राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देसाई यांची सन 2014-2018 या कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अँड़ मोहन खटावकर यांनी जाहीर केल़े सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष शरद कन्नमवार होत़े
त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी, उपाध्यक्ष दिलीप बच्चुवार, दिलीप अत्रे, पंकज शहा यांनी कौतुक केल़े
नूतन कार्यकारिणी अशी-
अध्यक्ष भरत ओझा (मुंबई), उपाध्यक्ष राजीव देसाई, प्रदीप जोशी, भालचंद भागवत (मुंबई) राजकुमार चोरडिया, विश्वास लोकरे (पुणे), डॉ़ दिलीप राणे (नवी मुंबई)़ सचिव सुंदर अय्यर (पुणे), सहसचिव राजीव देशपांडे (नाशिक), खजिनदार सुधीर भिवापूरकर (नागपूर)़

Web Title: Rajiv Desai, Deputy Governor of State Lawn Tennis Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.