राजेशचा चमकदार खेळ

By Admin | Updated: November 21, 2015 01:22 IST2015-11-21T01:22:28+5:302015-11-21T01:22:28+5:30

द्वितीय मानांकित आणि नॅशनल ‘बी’ विजेता फिडे मास्टर अविनाश आवटेला अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत १६व्या मानांकित राजेश गुप्ता विरुद्ध

Rajesh's shining game | राजेशचा चमकदार खेळ

राजेशचा चमकदार खेळ

मुंबई : द्वितीय मानांकित आणि नॅशनल ‘बी’ विजेता फिडे मास्टर अविनाश आवटेला अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत १६व्या मानांकित राजेश गुप्ता विरुद्ध बरोबरी मान्य करावी लागली. या अनपेक्षित निकालामुळे अविनाश इतर अव्वल खेळाडूंच्या तुलनेत पिछाडीवर पडला. त्याचवेळी अग्रमानांकित इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, चिराग साटकर, केतन बोरीचा आणि राजाबाबू गजेंगी या अव्वल खेळाडूंनी आपल्या सर्व लढती जिंकून प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थान पटकावले आहे.
बोरीवली येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत राजेश गुप्ताने (इलो १६८५) चमकदार खेळ करताना कसलेल्या अविनाश आवटेला (इलो २१३५) बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. दमदार सुरुवात केलेल्या आवटेला मध्यांतराला गुप्ताने चांगलेच कोंडीत पकडले. बोर्डाच्या मध्यावरच भक्कम संरक्षणाचे जाळे तयार करताना गुप्ताने आवटेला आक्रमणाची फारशी संधी न देता बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. यासह दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी अर्धा गुणाची कमाई केली.
दुसऱ्या बाजूला अन्य एका अटीतटीच्या लढतीत मुक्तेश राघवन (इलो १५८०) याने चमकदार खेळ करताना आपल्याहून बलाढ्य असलेल्या शुभम् कुमठेकर (इलो १९४५) बरोबरीत रोखले. तसेच अंकित भट्टाचार्यने (इलो १४४७) अनपेक्षित निकाल लावताना वेदान्त पानेसरला (इलो १८४९) पराभूत करण्याची कामगिरी केली.

ंआठ खेळाडू संयुक्तरीत्या द्वितीय स्थानी
स्पर्धेत अव्वल खेळाडू प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी असून, त्यांच्याहून अर्धा गुणांनी एकूण आठ खेळाडू संयुक्तरीत्या द्वितीय स्थानी विराजमान आहेत. यामध्ये फिडे मास्टर अविनाश आवटे, अमरदीप बारटक्के, प्रतीक शेनवी, राजेश गुप्ता, रवींद्र नरगुंडकर, अंकित भट्टाचार्य, यश कपाडी आणि आदित्य बांदेकर यांचा समावेश आहे.

Web Title: Rajesh's shining game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.